परिस्थिती...
परिस्थिती...
1 min
69
यशाची कारणे, नाही शोधली जातात,
अपयशाचे खापर मात्र, परिस्थितीवर फोडतात...
आपली मनोवस्थाच, ठरवत असते परिस्थिती,
ज्या नजरेने तुम्ही पाहता, तशी ती भासती...
परिस्थितीच असते, सर्वोत्तम प्रतिभेचं निर्मितीस्थान,
परिस्थितीचा नको बाऊ,उपजत क्षमतांच्या वापराचे हे वाण...
परिस्थितीला आपल्यावर, होऊ देऊ नका स्वार,
सातत्याने रहा कृतिशील, मिळतील विजयाचे वार...
