STORYMIRROR

Vinita Kadam

Others

3  

Vinita Kadam

Others

प्रीत

प्रीत

1 min
273

"कृष्णसावळी" सांजवेळ

कोमल "राधा" कामिनी तू

रममाण "श्याम" शामल

भासे कळी "कुंदाची" तू......१


"साजरी" परी तू "लाजरी"

"नाविन्या" तू "सोनसळीची"

"पितवर्णी" शाल पांघरी

ओली "हळद" शेवंतीची........२


"उपवनी" गोड "गुलाबी"

"रक्तांबुज" ती "लक्ष्मीकांती"

लाजून "लाल" गाली "सांज"

हळुवार अवतरती.......३


"नितळ" तुझी गोरी "काया"

"श्वेतवर्णी" शुभ्र "अप्सरा"

"मोगऱ्यासम" सुगंधित

येई "प्रीत" अशी "बहरा".....४


निळाईची "निलांबरी" तू

अवतरे "अवनीवरी"

"नटवर" तो "निशीकांत"

"नीशा" हसली "चराचरी"......५


"मदन बाण" रंगावली

देहात "रती" अवतरे

रंगात रंगता "संगिनी"

जीवनी "संगीत" बहरे......६


"चंद्रिका" राणी "चाफेकळी"

लाजतो "शशी" नभांगणी 

चमचम चमके "तारा"

तृप्त "चकोर" धरांगणी......७


Rate this content
Log in