परी
परी
माझी स्वप्न सफर
स्वप्न परी मज रोज भेटे घरी
पहाट साखर झोपेत मी ,
येऊन ती अलगद
थाप देई ,अन उठवी .
रूप तव साजरे शुभ्र लांब चंदेरी झगा ल्याली,
स्मितहास्य ते तिच्या खुले गाली,
सकाळची माझी कामे ती झटपट करी,
जादुई तिची छडी फिरवूनी.
अन जाई ती दूर देशी निघूनी.
होता सांज निलपरीचे होई आगमन
लांबच काळे कुंतल तिचे मन त्यांत हे गुंतले
चहापान ती देऊन मजला खुश करी हो
ढलता सांज येई लालपरी रूप तिचे काय वर्णावे
गोरी गोरी गोंडस गोजिरवाणी
खाणे पिणे पाहून घेई मी मात्र आराम करी
चंद्र येई साक्षीला वस्त्र जांभळे लेऊन येई ती
मदमस्त परी पाहून तिजला मन बेधुंद होई
ती गाऊन गीत मधुर मम मन रिजवी
रजनीची झाली वेळ रातराणी फुले अंगणी
मग काय सांगू तुम्हाला, आता तर मी महाराणी
सर्व च येति दिमतीला फुलांचा तो हिंदोळा
अन मोरपिसांचा मंद वारा अंगावर चांदण्यांचाशिडकावा
त्या धरी रिगणं, धरुनी ताल ,गातसे मधुर मंगल सुमधर गाण
आनंदे त्या नर्तन करी मी मात्र मंत्रमुग्ध.
स्वप्नातल्या ह्या पऱ्या मज वाटे त्या हो खऱ्या
रोजच स्वप्नी हा असे थाट पऱ्या थाटती नानाविध घाट
मी उठे मग सकाळी
रोजच्या कार्यात मग्न होई
स्वप्न असे परीचे पण पुढल्या दिवसाची मज अखंड ऊर्जा मिळत राही
