STORYMIRROR

Kshitija Bapat

Others

4  

Kshitija Bapat

Others

परी

परी

1 min
283

परी अग परी

येना माझ्या घरी

कधी स्वप्नात

कधी माझ्या अंगणात


जादूच्या दुनियेतील परी

घेऊन जा मला दूरी

दाखवना मला दरी खोरी

खाऊ आपण बिस्किट खारी


नेना मला बगिच्यात

कधी उंच आकाशात

कधी डोंगर पर्वतात

घेऊन जा तुझ्या विश्वात


पंख दे तुझे मला

निरखू दे चंद्राला

हात लावू दे तारांना

पाहुदे उडत्या पक्षांना


तुझी दुनिया न्यारी

कल्पनेतली सारी

ही दुनिया विषारी

जा घेऊन परी लोकांच्या दारी


साहित्याला गुण द्या
लॉग इन