परी माझी प्रेमाची खरी"
परी माझी प्रेमाची खरी"
1 min
401
परी माझी प्रेमाची खरी
आहे गोजिरी स्वप्नपरी
आली माझ्या जीवनी
घेवूनी अमृताच्या धारी ।।
जन्मताच कळशी
प्रेमाने ओतप्रोत भरली
मर्मबंधातली असुया
पुर्ण आनंदाने वेचली ।।
मागेमागे कशी फिरते
काना कोपरात लपते
डाव आला की कशी
मुळूमुळू ग रडते ।।
नखशिखात लावन्य
वेडेवाकडे डोलणे
बेभान वाऱ्यासम
दुडूदुडू धावणे ।।
रडून भडून करते परी
आपलेच खरे
नाही घाबरत जराही
मोठ्यांनाही सुटती घाबरे ।।
