परिचारिका
परिचारिका
1 min
299
पांढऱ्या पोशाखात सदैव तत्पर
दिवस असो रात्र सेवेसाठी तयार
रुग्णांची आपुलकीने घेई काळजी
नातलगांना देऊन मानसिक आधार
गरीब असो श्रीमंत सारे एकसमान
तिच्यापुढे कोणी मोठा नाही ना लहान
कर्तव्याला जागून करते ती सेवा
अनेकांना वाचविणारी ती आहे महान
कोणी म्हणती देवदूत तिला
तर कोणी म्हणे साक्षात देव
डॉक्टरांची खरी मदतनीस
दवाखान्यातील ती अनमोल ठेव
डॉक्टरांएवढी नसेल ती ज्ञानी
तरी तिची महानता लक्षात घेऊ
तहानभूक विसरून केली सेवा
तिचे उपकार नेहमी लक्षात ठेवू
