प्रेरणा
प्रेरणा
मी प्रेरीत झालो
भगवान बुद्धाच्या शांतीनं
प्रज्ञा , शिल, करुणा दिली
त्यांच्या सम्यक वाणीनं
मी प्रेरीत झालो
संत गाडगेबाबा च्या किर्तनांन
स्वच्छतेचा मंत्र देत फिरत होते
गाव - गाव गल्ली स्वतः झाडून
मी प्रेरीत झालो
महात्मा फुलें दांपत्याच्या स्फुर्तीनं
स्त्री शिक्षणाचा रोवला पाया
अंगावर चिखल झेलून सावित्रीबाईन
मी प्रेरित झालो
बिरसां मुंडा च्या क्रांतीन
लगान माफिसाठी इंग्रजां विरोधी
केले पहिल्यांदा आंदोलन
मी प्रेरीत झालो
बाबासाहेबांच्या लेखणींन
दिले भारताला निळे निळे
जागरूक असे संविधान
मी प्रेरीत झालो
थोर ,संत महात्म्यांच्या विचारानं
केले असत्या बिरोधातत बंड
सत्यासाठी जीवन केले अर्पण
