STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

3  

Meenakshi Kilawat

Others

प्रेमावरती लिहावे

प्रेमावरती लिहावे

1 min
165

प्रेमावरती लिहावे म्हणतेय

दाखवूनी चरे काळजावरचे 

श्वासात भरलेला कळवटपणा

अलगद कागदावर चित्तारायचे...


मग एक अलवार स्पंदनाने

 नात्यांचा खोटेपणा रेखाटणे

डोळ्यांच्या पापण्यातुन पाडून

स्वत:च्या हातानेच खोडणे....


मेंदी भरल्या हातांमध्ये कसे

श्वासांचा दरवळ भरायचा

मिलनाच्या सागर लाटा

थांबून डूंबून खोडायचा....


 दुधाळ चटक चांदण्यात

संगमरवरी दगडावरती

धुक्याची शाल पांघरूनी

जागल्या रात्री तडफडती...


दूर सनईचा सुर ऐकता 

कोमल हृदयाची मलीन गती 

येती भाव गीताचे ओठी

भेटीला ह्रदया होती आतुर ती...


Rate this content
Log in