प्रेमावरती बोलू काही
प्रेमावरती बोलू काही
1 min
11.4K
डोळ्यातल्या अश्रूंच्या
पडती गालावर सरी
बोलत नाही काही मी
समोर तू आला तरी
तुझ्याविना रे माझं
दुनियात तरी कोण
साथ दे थोडी आता
पकडून हात दोन
रस्त्यात आला कधी
अडथडा चालतांना
घेशील तू सांभाळून
ठेच लागून पडतांना
पडली जरी कधी
उचलून धरशील तू
उभं करून पुन्हा
पकडून चालवशील तू
पुढे पाऊल टाकण्यास
प्रोत्साहित तू करशील
कार्य नवे करण्यात
उत्साह पुन्हा आणशील
