प्रेमात सगळं क्षम्य असतं
प्रेमात सगळं क्षम्य असतं
1 min
483
पहाटेची आल्हाददायक प्रसन्नता
वाटे मज प्रसन्न
आठवण येता तुझी हुरहुर वाटे मज
सोडूनी मज गेला तू
सोडूनी तुझे प्रेम मज जवळ
प्रेमाच्या सुखासाठी झुरते मी आज
दाहकता तुझ्या प्रेमाची ना सोसवे मज
आठवण येता तुझी हुरहुर वाटे मज
दिलं मज तू सुखाचा सांज
ह्या संजेपोटी सुख मिळे मला आज
सोबत दिली तू मज सुखाची आस
आठवण येता तुझी हुरहुर वाटे मज
सोसवेना मला तुझा हा स्पर्श
सोसवेना मला तुझा हा विरह
भावना माझ्या जपे मी निरपेक्ष
आठवण येता तुझी हुरहुर वाटे मज
