प्रेमापोटी माझ्या"
प्रेमापोटी माझ्या"
1 min
160
कुंजन करी मंजुळ पक्षी
अरुनोदयात लाली मदभरी
घेई भरारी ह्रदय आकाशी
होतसे प्रेमात मी बावरी...
मोहोराने वृक्षच भरला
पाडावर आंबाही आला
कोकीळेची कुहू कुहू कानी
राजसा जपते मी माला....
भेट होता त्या वळणावर
सात जन्म सोबतीला मी असेन
शपथेवर असे वचन दिले तू
प्रेमापोटी माझ्या बोल तू हसून...
आता सोडू नको जीवलगा
वेडावले माझे मन सजनं
वाट बघते तुझी प्रिया रे
युगायुगाचे आहे नाते संमध...
