प्रेमाने क्षितीजात फुलवून फुल
प्रेमाने क्षितीजात फुलवून फुल
प्रेमाने क्षितीजात फुलवून फुले
निश्चितच होती पुर्ण सुखद आस
सत्कर्माची वाटेने चढावा घाट
जीवनात येतोय सुखाचा घास।।
आयुष्यात जगावयास लागतेय
प्रेम दया, माया, मैत्रीची सुभाषिते
सुखाला दुखाला आवळूनी
ठेवायची आपुल्याच स्वहस्ते।।
हृदयी असते माणवाच्या वासनां
अनेक विंवचनेत गुररफटतोय
लोभामुळे अमुल्य क्षणाचा ऱ्हास
सुखाचा घास नशिबात नसतोय।।
नम्रता अंगी असावी भरूनी
आचरण शुद्ध अन सात्विक
कष्टाला ही शिकस्त द्यावी
तृप्तीचा घास मिळतोय आंशिक।।
आनंदाचा सोहळा जन्म दिनी
बुद्धीचा प्रगल्भ विकास होवूनी
कष्टकऱ्यांना घास सुखाचा देवूनी
सार्थक करावी वाटचाल जीवनधामी।।
