प्रेमाचं तोरण
प्रेमाचं तोरण
1 min
325
देह हर्षात आज झुले
तुम्हासाठी माळीले फुले
मी डोळ्यास प्रेमाचं, नवं तोरण बांधले
दिलबरा, पिरतीच्या धाग्यात अडकले।।धृ।।
लाखात एक मी हिरकणी
नखरेल नार मी देखणी
कशी सजली नटली राया
नको शृंगार जाया हा वाया
तुला पाहुन मन हे रातीत गंधाळले..
दिलबरा, पिरतीच्या धाग्यात अडकले..!!१!!
लखलखती मी सौदामिनी
रूपाची रं चटक चांदणी
तुला दिसते का रे चकाकी
शोभे नथणी सरळ नाकी
बाहुत मला आज प्रेमाने का धरले
दिलबरा, पिरतीच्या धाग्यात अडकले..!!२!!
