प्रेमाची रेशीमगाठ
प्रेमाची रेशीमगाठ
1 min
403
दोन जीवाच्या प्रेमाची रेशीमगाठ
स्नेहाची ही वाटचाल जन्मभराची
एकमेका समजून बहरतय फुलवारी
संसार वाटीकेत सुगंधी सुवासाची...
प्रेमळ व्यवहार प्रीत भरवतेय
सप्तपदीची लाज राखण्या संसारी
त्याग समर्पण आपल्या प्रीयजनास
हर्षविते या मायेच्या संसार सागरी...
