प्रेमाची परिभाषा
प्रेमाची परिभाषा
1 min
386
कुठूनसे एक फुलपाखरू येते
अलवार कळीला चुंबुन जाते
लाजून लाजून कळी उमलते
कळीचे मग फुलच होते
चिंता त्यांना नसे उद्याची
कळते भाषा फक्त प्रेमाची
कळली रीत जगण्याची
परिभाषा ती सुखाची
फुलातील सेविता मकरंद
दोघांनाही मिळे आनंद
दोन दिसाचे जीवन परी ते
दोघेही जगती स्वच्छंद
