प्रेमाची कबुली
प्रेमाची कबुली
1 min
173
अरे वेड्या, तुला वाटलं मी तुझ्याजवळ नाही
असे समज, सावली समजून तुझ्याभोवती आहे
आठवण तुझी येता क्षणभर डोळे तू मिटून घे
हळूच श्वास घेऊन मनामध्ये तू मला भरून घे
अरे वेड्या, तूच माझा सागर तुच माझा किनारा
तूच माझे ध्येय आहे आयुष्याची पुंजी पण तू आहे
तूच माझ्या भास आहे तूच माझा आभास आहे
तूच माझी रास आहे समुद्राची लाट पण तूच आहे
