प्रेमाचे लाडके मनमोहन...
प्रेमाचे लाडके मनमोहन...
फुलासारखे बाळाचे जीवन
नाजूक पाकळ्या अंतरमन
निरागस ते कमळासारखे
प्रेमाचे लाडके मनमोहन...
छोट्या सोबत मोठ्यांना ही
नादी लावती ही बालतरू
उत्कर्षाची फुले बहरती
उद्याचे हे फुलपाखरु.....
मस्तीत चाले मस्तीत डोले
बोल तूझे असे अती शहाने
हवेसे तुझे लाडने बागडने
घरातील तू रे मधुर गाणे
अशीच असावी गोडी तुझीया
अद्भूत वाटे आनंदमय पर्वणी
अमृताची गोडी तुझी रे
बोल बोबडे ही मंजूळ वाणी...
खोड्या करिती त्रास देती
तरी तुज कवटाळी प्रेमाने
जरी रागावणे मारणे बळेच
नयन पाझरती तुझ्या वेदनेने.
मधुर तुझे जीवन जगणे-मरणे
लाभे आयुष्य सुंदर निर्व्यसनी
इमानदारी ने घे गरुड भरारी
गरिबीत ही हो स्वभिमानी.
निडरतेने मार्ग तुडवून परक्यांचे
कष्ट घ्यावे ओंजळीत भरुनी
नसे असुया कुणाची मनी
संस्काराचे फुले असावी आचरणी
