STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

प्रेमाचे इमले

प्रेमाचे इमले

1 min
138

प्रेमाची व्याख्या काय हो?

आपुलकी,जिव्हाळा जपावा

नातेवाईक,कुटुंबाला माया द्यावी

सजनाचे ह्रदयात निवास करावा....


प्रेम हे कधीच होत नसते बरे

प्रेम हे एकमेकावर करावे लागते

आपलेपणाने सार्‍या माणसांना

अंतरातून खूपच जपायचे असते...


नात्याची वीण कायम घट्ट असावी

नात्यांना मायेनं जवळ करूया

कुटुंबासाठी,समाजासाठी जगूया

उदास मात्र कधीच न होवूया......


माणसामाणसात भूतदया पेरूया

जीवनाच्या वाटेवर प्रीतडोंगर बांधूया

सर्वांच्याच साथीने सुरेख जीवनात

प्रेमाचे -प्रेमाने इमले छान रचूया.....


हे सर्व करताना मनाला फार जपूया

तरूण जरी नाही राहिलो आपण रमूया

पण वय नसलेलं मन मात्र जपूया

प्रत्येकाच्या अंतरी खोलवर रूजूया....


साहित्याला गुण द्या
लॉग इन