Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Varsha Shidore

Others

2  

Varsha Shidore

Others

प्रेमाचे भावगीत...

प्रेमाचे भावगीत...

2 mins
145

सोबत दुःखात

आभास सुखात 

विश्वास नात्यात 

आदर प्रेमात... १

रुसवा गालात 

बघण्यास तुरा 

होई चपखल 

नजरा आतुर... २

दोघांचेही हाल 

नेहमी समान 

असे साक्षीदार 

जिव्हाळ्याचे दान... ३

भावनांचा खेळ 

वाटे कधी गुंता 

खूप भाग्यवान 

कळली बंधुता... ४

लहान थोरही 

सज्ज भांडण्यास 

पण नाही कधी

खंड संवादास... ५

कुटुंब कबिला 

सदैव साथीला 

प्रीतीला आपल्या 

आशिष लाभला... ६

वेड्या गोंधळात

संसार फुलला 

लडिवाळ थाट 

छान उजळला... ७

प्रेमळ ओंजळ

तुझी माझी प्रीत 

अनोखी कहाणी 

जणू भावगीत... ८

आपल्या प्रेमाचे 

गुपित रहस्य 

देत राहो सदा 

गोड स्मित हास्य... ९

Rate this content
Log in