प्रेमाचा गुलाब
प्रेमाचा गुलाब
प्रेम कर पण हुरळू नकोस
प्रेमी होऊन रस्त्यावरती
तिला छेडू नकोस
प्रेमाचा गुलाब मना फूलवायचं....
मायाळू असेलच तुझ्या
ह्रदयात येणारचं
त्या खऱ्या प्रेमाचा सुगंध
आज ना उद्या ओळखणारच..
आपली मेहनत आपली मिळकत
जगात दाखवायची आपली झलक,
आधी आपले किमती
आयुष्य घडवायचं....
चंद्र चांदण्या तोडायची कश्याला
स्वप्नं तिचं होवूनी जबरण
टपोरी प्रेम कां दाखवायचं
नाही भेटली म्हणुन
का आकडा तान्ङव करायचं..
मनात तिच्या उतरायला
कृती चांगली ठेवायची
अज्ञानावर पांघरून घालूनी
तिला कां छळायचे
नाही मिळाली तर कां
तिच जीवन नासवायचं?..
झुरावं कश्याला एकट्यानं
तिलाही झुरू द्यायचं
आईबापाला सोडून
फुफाट्यात कां पडायचं
अन जाचक यातनेतून
मरण का बोलवायचं..
