प्रेम
प्रेम
1 min
224
मुरली मोहन तू
शाम सावळा
क्रुष्ण कन्हैया
प्राजक्त शोभे गळा
मदन गोपाळ तू
राधिका तुझी
प्रेम बावरी
रंग रंगला साजी
आजन्म वाहिले तू
प्रान तुजला
परम प्रीत
क्रुष्णाचीच भेटला
साथ होती तुमची
अजरामर अशी
बासरी मोहि
तुजला खास जशी
शुध्द भाव भक्तीचा
आस प्रेमाची
मन रंगले
एकमेकात त्यांची
रास लीला करवी
मधुसूदना
रूप लाघवी
भुलवि राधिकेला
