प्रेम
प्रेम
1 min
180
क्षणास कर्माचा
जीवन सोहळा,
सौख्याचा परीस
प्रपंच निराळा...
सत्कर्म गाठीशी
मन स्वच्छ ठेवू,
जीवनाची यात्रा
डोळाभर पाहू...
हसता-रडता
समजून घेऊ,
यशाचे गमक
मनात बाळगू...
आपण आपले
सांत्वन करावे,
पापणी आडून
दुःखा दडवावे...
चित्ती समाधान
राम नामी रंगू,
दुःखाचा डोंगर
जगताना त्यागू...
जीवन सरीता
झुळझुळ वाहे,
जीवन सोहळा
नयनांनी पाहे...
