STORYMIRROR

Bharati Sawant

Others

3  

Bharati Sawant

Others

प्रेम

प्रेम

1 min
236

कथा आपल्या प्रेमाची

होईल का सखी संपन्न

नको समाजाची पर्वा

करतील प्रेमाला विपन्न

इतिहासाच्या पानावर

लिहू आपली प्रेमकथा

तू रांझा मी तुझीच हीर

नाही प्रेमात काही व्यथा

स्नेहार्द्र गोडवा मनातला

नात्यागोत्यांत तो दिसावा

ऋणानुबंध जोडू सर्वांशी

प्रेमाचा स्नेहबंध असावा

पूर्वपुण्याईचे फळ मला

मिळालेय तुझ्या प्रेमाने

दिनरात करीन मी कष्ट

भिजूनच जाईन घामाने


साहित्याला गुण द्या
लॉग इन