STORYMIRROR

Bharati Sawant

Others

4  

Bharati Sawant

Others

प्रेम

प्रेम

1 min
432

प्रीतीचे आपल्या गुज

सांग ना माझ्या कानात

भेटशील का सांजवेळी

काय आहे तुझ्या मनात


गंधाळलेय मन माझे पहा

सुखाची केलीस बरसात 

सख्या मिठीत मज घेण्या

आलास भिजत पावसात 


बेधुंद अनावर या भावना

मन बनलेय माझे पाखरू

एकांती होतानाच समरस

प्रेम तुझे मी कसे विसरू


चल फिरू या सागरतीरी

घेऊनी दोघेच हातात हात

साथ देऊया जीवनभराची

वाहतोय हा मंद धुंद वात


केलीस रूजवण तू प्रेमाची

माझ्या हृदयाच्या कप्प्यात

जगूया एकमेकांच्या सोबत

प्रेमाच्या अशा या टप्प्यात 


साहित्याला गुण द्या
लॉग इन