प्रेम
प्रेम
1 min
69
नाते तुझे नि माझे
जगावेगळे होते
का विसरलीस आता
तु का थोडी दुरावते
नाही नाही म्हणता
प्रेम होऊन गेले
जगण्यात आता
अर्थ ही आले
प्रीत बहरलेली
आपली जगात
गाणे ही प्रेमाची
गाउनी मनात
तू जवळ हवीस
आणखी काय हवे
प्रेमाचा अधिकार
म्हणून करी दावे
