प्रेम
प्रेम
मनाच्या अंगणी लखलखली प्रीतीची चांदणी
छेडून प्रेमगीत हात दे हाती सखे साजणी ||धृ ||
घातलीस साद सख्याआले मी पाखरू बनूनी
तुझ्यासंगे जीवनी धागे प्रेमाचे घट्ट विणुनी
चिडविती मजला तुज नावे पहा या मैत्रिणी
छेडून प्रेमगीत हात दे हाती सखे साजणी ||१||
स्पर्श होताच तुझा सख्या मोहरले माझे तन
मिलनाची ओढ तुझी रे हरखुन गेले मन
आठवांचे कोंदण खुलले गाली माझ्या त्या क्षणी
छेडून प्रेमगीत हात दे हाती सखे साजणी ||२ ||
धूंद हा एकांत मिळाला होऊ दोघे समरस
शोष ओठांनी अमृतकुंभ भरला मधुरस
घे ना मिठीत सख्या तू मजला आलेय मी झणी
छेडून प्रेमगीत हात दे हाती सखे साजणी ||३ ||