प्रेम वाटेवरी....
प्रेम वाटेवरी....
1 min
196
प्रेम वाहत्या पाण्यासारखं असतं
वाटेल तसं वाट शोधत असतं
मन सैर वैर धाव घेत राहतं
सतत प्रेमात वाहवत असतं
सगळं काही निसटत असतानाही
आशेचं सत्र मात्र सुरूच असतं
प्रेमवेडं मन काहीसं पुन्हा पुन्हा
आनंदात वेड्यासारखं नाचत राहतं
न समजणारे मूक शब्द सुद्धा
नकळत जवळ येत राहतात
दुरावत चाललेल्या भावना
अनोळखी होणं मात्र विसरतात
प्रेमात रम्य दिव्य रंगताना
चित्र अवघ्या आयुष्याचं उभं राहतं
कधी चित्रविचित्र ते रेखाटलेलं
शेवटी मनासारखं रूप भेटतं
