STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

4  

Meenakshi Kilawat

Others

प्रेम तुझ्यावर मी रे करते

प्रेम तुझ्यावर मी रे करते

1 min
124

दुराव्याचे कोडं अद्याप ही

सलती माझ्या या मनाला     

प्रेम तुझ्यावर मी रे करते

कसे कळत नाही तुजला.¡¡ 


उडता मनाची पाखरं

वादळ आले भयंकर

सापडले वादळाला 

जीवनी उरला हा विरह..¡¡


ठाव घेवू कशी ह्रदयाचा

वेदना या छळती ह्रदयाला   

आणा शपथा खोटी ठरली

भातूकलीचा खेळ झाला....!!


वाट पाहता डळमळते

नयन माझे नित्य झरते

लागेना माझा रात्री डोळा

ग्रहन लागले जीवनाला..¡¡      


हादरले हे मन माझे आता 

मजला आधार तूझिया होता

भाग्य म्हणूनी गोंजारिते

अधूरे स्वप्न नव आशा..¡¡


जन्माचे हे भविष्य भाकित

रचले जणू का माझ्यासाठी

कां दिली विरहाची सल मनी 

मन पाखरू झुरतेया साथीला..¡¡


भाषा नजरेची कळू दे माझ्या

कठोर निर्दयी मनाला तुझ्या   

दृष्टी मिळेल संसारात रमूनी

बाळ रडती क्षणोक्षणी..¡¡


करू नको अपेक्षाभंग ही

मज वाट मिळेल जगण्या

नशिबाने थट्टा कशी केली 

विरहाच्या डोहात बुडविण्या..¡¡


पाण्यामधली ही जीवननौका

विणा आधारे डूबली खोल का

विनविले बहु मी तुला स्मरूनी 

चित्र दिसे विरहाचे या मनाला..¡¡


Rate this content
Log in