STORYMIRROR

Anita Gujar

Others

4  

Anita Gujar

Others

प्रेम तुझं माझं

प्रेम तुझं माझं

1 min
306

प्रेम एक संजीवन

हृदयात तेवणारे निरांजन,


प्रेम एक गोड भास

तूझा माझा एकच श्वास,


प्रेम एक सुखाची चाहूल

नकळत पडलेली मनाला भूल,


प्रेम एक निरंतर नातं

ते न जाणे जात पात,


प्रेम एक स्पर्श उबदार

वाटे एकमेकांचा आश्वासक आधार,


प्रेम एक दोन मनांचा संगम

डोंगरातून होतसे नदीचा उगम,


प्रेम एक जीवन सरिता

प्रेमाचा पाझर फुटेल अधरा


Rate this content
Log in