STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

3  

Meenakshi Kilawat

Others

प्रेम नित्यची असावे देशावरी"

प्रेम नित्यची असावे देशावरी"

1 min
172

प्रेम नित्यची असावे देशावरी

कर्तव्य करूनी जगावे जीवनी

सर्वधर्म समभावाचे पाजूनी अमृत

उगवा नव अंकुर जनमनी.!!

हिंदच्या कोहिनूरी हिऱ्यांची ही

श्रेष्ठ प्रणाली सत्य शांतीचा झरा

चिरायू होवो भारतीय स्वातंत्र्य

स्वप्न बाळगुनी फुलवूृ ही धरा.!!

देशप्रितीची उजळून ज्योती

स्वातत्र्यांची अमुल्य महती

आपणा दाखविला मार्ग हा

त्यांनी कर्तूत्वाने आणिली शांती.!!

गेली होऊन सावित्रीबाई

तारीले स्त्रीच्या अस्मितेला   

शत वंदन करा या देवीला

अन तिच्या निस्वार्थ कर्तृत्वाला.!!

धडपड जाणावी आजच्या स्त्रीची

परंपरेतुन स्वतंत्र जगण्यासाठी

उगवली स्त्री-मुक्तीची पहाट

पुर्ण होतील स्वप्न प्रगतीसाठी.!!


Rate this content
Log in