STORYMIRROR

varsha sagdeo

Others

4  

varsha sagdeo

Others

प्रेम म्हणजे शाश्वतता

प्रेम म्हणजे शाश्वतता

1 min
106

हो प्रेम, केले आहे मी, फक्त प्रेम

माझ्या जीवनात व्यापले आहे प्रेम,

विसरले आहे साऱ्या जगाचे भान,

विसरले आहे मी माझे ही देहभान


माझ्या कणाकणात भिनले प्रेम

प्रत्येक श्वासावर कोरले आहे प्रेम

माझ्या ह्रदयाच्या लयीत स्पंदे प्रेम

माझे संपूर्ण अस्तित्व म्हणजे प्रेम


सकाळी उठायताच दिसते

बागेतल्या शुभ्र मोगराचा मृदृगंध 

मला करतो चिंब तुझ्या प्रेमात

लालबुंद जास्वंदी रंगली सांजवेळ

 

ही कातरवेळी जीवाची घालमेल 

प्रेम विरहाची ही जीवघेणी व्यथा

तू येताच मनात सप्तरंगी ऊधळण

प्रेमात माझ्या मनाचे होइ इंद्रधनुष 


मिलन-विरहाच्या सप्तरंगी प्रेमावर

असेच आयुष्य भर प्रेम करत रहावे

हातात हात धरून एकरुप होत जावे

एकाला न्यायला नियती धजणार नाही


Rate this content
Log in