प्रेम म्हणजे काय असतं?
प्रेम म्हणजे काय असतं?
प्रेम म्हणजे काय असतं?
******************
काय हा भलताच प्रश्न?
प्रेम म्हणजे काय असतं?
पुसू नका कोणी हो
ही अनुभवाची लेणी हो
हातात हात ,सदा सहवास
छे हे काय भलतेच?
प्रेम म्हणजे आपुलकी
प्रेम म्हणजे जाणीव,
एकमेकांच्या सुख दुःखाची.
तेथे नसतो दिखावा ना बडेजाव पणा.
ना पैशांचा चुराडा ना बेफिकिरपणा
काय असतं हो प्रेम ?
प्रेमात सारं काही असतं.
प्रेमात विशेष काही नसतं.
ते अनुभवायचं असतं .
भरभरून मिळत रहातं.
त्याच्या मागं धावायचं नसतं हो .खरं सांगू का?
दिल्यानं प्रेम वाढत राहतं
कशाला पुसता राव?
प्रेम म्हणजे काय असतं?
प्रेम म्हणजे अनमोल धन
जे चोरी होत नाही की ,
दिल्यानं कमी होत नाही
तर मग लागू कामाला
प्रेमाने हे जग जिंकूया आणि
विश्व प्रेमाचे दूत बनुया
