प्रेम कुशीतले...
प्रेम कुशीतले...
चिमुकल्यांना घर नाही, दार नाही
पहुडण्यास कोणताच आसरा नाही
भावाच्या कुशीत शांत निजलेल्या
बहिणीवर दुःखाची छाया नाही
उपाशीपोटीसुद्धा उदार काळजाला
स्वार्थाचा अंधूकसाही स्पर्श नाही
बहीणभावाच्या या प्रेमळ नात्याला
वरवरच्या वेदनांची काहीच तमा नाही
आपुलकीच्या या निष्पाप मायेस
जरी पोटाला गरिबीचे असंख्य चटके
तरी चेहऱ्यावरच्या भुकेपायी एकमेकां
दूर लोटण्याचे नाही चिडखोर फटके
उघड्यावर निजलेल्या आयुष्यावर
नामुष्कीचा नसावा वेदनादायी घाव
भेदभावाच्या उपकारी साहाय्य भावनेने
दुजाभावाचा नसावा हास्यास्पद भाव
