प्रेम केले तुझ्यावर फार
प्रेम केले तुझ्यावर फार
1 min
378
वेडे प्रेम केले मी तुझ्यावर
पण तू जाणले नाही
मी किनारा होतो तुझा
तू त्यातली एक लाट होती
जगण्याला तुझ्याशिवाय
मन माझं लागत नाही
चांदणे आले माझ्या दारात
ते तुझी आठवण घेऊनी आले
कसं सांगू मी त्यांना
सोबत तू माझ्या नाही आता
तू माझी आशा होतीस
तू विसरली प्रेमाला माझ्या
सोबत घेऊनी फिरतो आता
माझा हा एकटेपणा
