Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

SURYAKANT MAJALKAR

Others

3  

SURYAKANT MAJALKAR

Others

प्रेम हे..

प्रेम हे..

1 min
225


प्रेमाची परिभाषा सर्वांची वेगळी असते

प्रेमाचा महिना आलाय, कुणाबद्दल प्रेमाची भावना असेल तर ते व्यक्त करा

प्रेम करा, व्यक्त हो पहिलं किंवा दुसरं नसतं,

ते खरं किंवा खोटं नसतं,

प्रेम हे प्रेम असतं


प्रेमाला वयाचं बंधन नसतं,

प्रेमाला जातीधर्माचं बंधन नसतं,

कुठलेही आढेवेढे न घेता 

थेट हृदयात उतरणं असतं,

प्रेम हे प्रेम असतं

ते मायलेकराचं असतं,

ते चिमणी-पाखरांचं असतं,

ते बहीण-भावाचं असतं

ते अनोळखी मनाचं असतं

ते जसं विजातीय असतं

तसचं ते सजातीयदेखील असतं

त्यात लिंगवर्णाचं गणित नसतं


प्रेम हे प्रेम असतं

त्याला दुसरं नाव नसतं

वजनाचं मोजमाप नक्कीच नसतं

ते जगण्यावर असतं

आणि आपल्या स्वभावावर असतं

नजरेतून उलगडत आयुष्य 

व्यापणारं असतं,

ते शब्दांवर, संगीतावर, रागांवर असतं

ते सर्व विश्वात सामाणारं असतं

प्रेम हे प्रेम असतं


இந்த உள்ளடக்கத்தை மதிப்பிடவும்
உள்நுழை