प्रदूषणमुक्त दिवाळी
प्रदूषणमुक्त दिवाळी
नको लवंगी माळ ,नको रस्सी बॉम्ब
सारेच सोडतात विषारी धूर ,
म्हणूनच म्हणते फटाक्यामुळे
श्वसन विकाराचे येतील पुर....
एक तर झाड लाव दारी
बाईला दर्पण, घराला घरपण
बाग कामाची हौस न्यारी
घराला शोभा येईल भारी...
डोळ्यात चुरचुर ,फुफुसात घरघर,
नको लावू फटाके दारी,
हौस ती फटाके फोडण्याची..
आवर घालू तिला आतातरी..
धुक्यासवे उडणारी धूळ
जोडीला फटाक्यांचे कर्कश सूर ,
आजी आजोबा नि समाज आपला
रुक्षण करण्या उचलू पाऊल...
फळा फुलांनी फुलू दे वृक्षदारी
प्रदूषण राक्षस पोबारा करी ,
भूमीची गुणवत्ता सुधारेल जरी
झाडे लावा झाडे जगवा करा मंत्र जारी....
एकजुटीने वृक्षारोपण करू या
अनेक जीवांना अस्तित्व देऊ या,
स्वच्छ सुंदर गाव बनवू या
ऑक्सिजन वाढण्यास हातभार लावू या....
स्वतःपासून सुरवात करू या
वृक्षतोडीला आळा बसवू या ,
फटाके नको, झाडे लावू या
स्वच्छ भारत अभियान राबवू या...
प्रदूषणमुक्त दिपावली साजरी करू या
