STORYMIRROR

Meena Mahindrakar

Others

3  

Meena Mahindrakar

Others

प्रदूषण

प्रदूषण

1 min
11.9K

हसरी वसुंधरा

झाली दुःखी

हटवुया प्रदूषण

करूया तिला सुखी


नदी-नाले आटले

झाली वृक्षतोड

रया गेली सारी

झाला तिचा हिरमोड


प्लास्टिक कचरा

विल्हेवाट होईना

प्रदूषण वाढे

जमिनीचा पोत सुधरेना


कचऱ्याची विल्हेवाट 

व्हावे यावर संशोधन

प्लास्टिकबंदीचे

पाळावे सर्वांनी बंधन


वाढवले प्रदूषण आपणच

कमी आपणच करूया

निसर्ग कोपला आता

नियम त्याचे जगुया


दिले निसर्गाने भरभरून

त्याची किंमत ठेवूया

दुःखी वसुंधरेला

पुन्हा हसवूया


Rate this content
Log in