प्रभात
प्रभात
1 min
298
सोनपिवळ्या किरणांची प्रसन्न प्रभात,
निळ्या अंबरी उधळत सप्तरंगात.
अलौकिक सौदर्याची करत पखरण,
अर्थपूर्ण जगणे,करे सोनं आयुष्यात.
नववधु अवतरली ही लाजत मुरडत,
धुक्याच्या ओढणीत अवनी नटलेली.
शांत, शुद्ध, संयमी हवा होत नशीली,
विविध रंग फुलांची मैफिल सजलेली.
दैदिप्य किरणोत्सव अक्षता शिंपत,
पाखरांची किलबिल जागे रानमाळ.
सरता रात्र काळ उषःकाल उजळून,
नटे,धरणी सप्तरंगी शालूत तात्काळ.
बहरे तृणपाती नवचैतन्य न्हाऊनी,
शांत मृदगंध परिसस्पर्शात उधळत.
हिरवाईवर शोभे मोत्यांचे अलंकार,
दातृत्व ऋण फेडे, सुगंध परिमळत.
