STORYMIRROR

Shila Ambhure

Others

5.0  

Shila Ambhure

Others

प्राजक्त

प्राजक्त

1 min
325

अंगणात माझ्या

प्राजक्ताचे झाड

जपले मी तया

बाई जीवापाड।।धृ।।


सांज समयाला

पसरे गं गंध

सुवासाने होई

परिसर धुंद

कवतिक लई

किती करू लाड।।1।।


आयाबाया नेती

पसा पसा फुलं

खेळाया एचिती

शेजारची मुलं

कळ्या लपविती

पोरी बाई द्वाड।।2।।


श्रावणाच्या मासी

आले सणवार

प्राजक्तास झाला

फुलांचा गं भार

पूजेलागी जन

घालितात धाड।।3।।


स्वर्गलोकीचे हे

झाड असे खास

अंगणात माझ्या

त्याचा रहीवास

चांदण फुलांनी

लाविले गं याड।।4।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन