STORYMIRROR

Vinita Kadam

Others

4  

Vinita Kadam

Others

प्राजक्त

प्राजक्त

1 min
563

(असंगती अलंकार)


बहरे "प्राजक्त" स्वर्गांगणी

दरवळे "आसमंत" धरांगणी

झाड लावी "कान्हा" "भामांगणी"

पडे दलपुंज "रुक्मांगणी"


नवल झाले "किमया" पाहे ती

प्रेमांतरी "गर्व" लयास जाती

गुंफली धाग्यात सुमने ती

भासे "रांगोळी" देवापुढती


"पारिजात" नव्हे केवल "रत्न" 

वाटे मजला "पुष्प" अनोखे

समुद्र "मंथना" काढण्या यत्न

रंगरूप, दरवळ ओळखे


नाजूक "कुसूमे" मौल्यवान

छतावर सडा "माणकांचा"

"सत्यभामा" ती राजमान

गंधित परिसर "दशदिशांचा"


Rate this content
Log in