STORYMIRROR

शिवांगी पाटणकर

Others

3  

शिवांगी पाटणकर

Others

पोलीस

पोलीस

1 min
312

लोकं किती नावं ठेवतात याला

किती काही बोलतात याला


ज्यांच्या संरक्षणाचा घेतला आहे विडा

त्यांच्याशीच द्यावा लागतोय लढा


सण उत्सव असू दे कधीच नसते याला रजा

आपण मात्र घरात बसून करत असतो मजा


दंगल मोर्चे असले की आपल्याला आठवतो

मग बाकीच्या दिवशी आपण कसे विसरतो


ऊन वारा पाऊस कशाची न करता पर्वा

देश रक्षणार्थ सदैव असतो खंबीरपणे उभा 


आयुष्य सारं याचं गेलं करण्यात बंदोबस्त

चोवीस तास असतो ड्युटी करण्यात व्यस्त


घराकडे कधी देता आलं नाही लक्ष

जनतेसाठी आपलं पोलिस खातं आहे कर्तव्यदक्ष


देशासाठी सोडलं यांनी घरदार

जनतेलाच मानलं यांनी आपला परिवार


तुझ्या खाकी वर्दीला सलाम

अन् त्या वर्दीतल्या देवाला प्रणाम 


Rate this content
Log in