पणती
पणती
1 min
176
पणतीतील वात प्रकाशमय झाली
सण दिवाळीचा घेऊन आली ।।1।।
लख्ख दिव्यांची आरास सजली
कंदील तो तेजाने प्रकाशला ।।2।।
रांगोळीने सजला परिसर
ऊजळुन दीप वाती ।।3।।
वसुबारस त्याचे महत्त्व
गोवात्सल्य जागवी मनाला।।4।।
लक्ष्मी मातेचे करू पूजन
दिवस उजाडला दिवाळीचा ।।5।।
