पंधरा एप्रिल(15)
पंधरा एप्रिल(15)
दुसरा लॉकडाऊन सुरू....!
दु सरा लॉकडाऊन सुरू झाला
स रसावली बाही शर्टाची
रा जरोस पणे सुरू झाली
लॉ जिंग नित्य ड्युटी परटाची
वाटलं
क सलं नशीब खडतर राव...!
डा वे उजवे सारे प्रयत्न झाले
उ खाळ्या पाखाळ्या झाल्या
न सते उपद्व्यापही झाले
सु चना प्रतिसूचनाही झाल्या
पण
रु सवा फुगवा काही सरला नाही....!
सायंकाळी फर्मान निघाले
घरीच आहात तर आता...!
इतक्यात माशी शिंकली
नशिबाने उचल खाल्ली
सारे मुसळ केरात गेले
मनसुबे सारे क्षणात विरले
म्हटले देवा तू आहेस...!
म्हणून तर दुसरा
लॉकडाऊनसुद्धा आम्ही
आता लीलया पार करू
आरोग्यासाठी सारेजण
घरातच बसू, घरातच बसू....!