STORYMIRROR

Chaitrali Dhamankar

Others

3  

Chaitrali Dhamankar

Others

पिताच झाला भक्षक

पिताच झाला भक्षक

1 min
361

काळजात पेटला वणवा

ऐकून आक्रोश सानुलीचा

हात टाकला अंगावरती

नाही थबकला हात बापाचा ||

आई जाते कामासाठी

सांभाळ करी बाप मुलीचा

बाहेर पडता पाऊल आईचे

खेळ सुरु विकृत बापाचा ||

उघडे केले सानुलीला

सर्वांगावर हात फिरे

चुंबन घेण्या हापापलेला

गुप्तांगांवर नजर भिरभिरे ||

निपचीत पडली गादीवरती

अवगत नव्हता अर्थ प्रेमाचा

समोर उभी मुर्ती बापाची

नाही उमगला अर्थ खेळाचा ||

अंगावरती भार टाकला

कळवळली पोर, दबला श्वास

वासनेची तरी हाव सुटेना

ओरबाडून मिळवण्याचाच हव्यास ||

श्वास घेतला पोरीने शेवटचा

बापास तरीही लाज वाटेना

बिथरली समोरील चित्र पाहूनी

डोळ्यात आईच्या राग मावेना ||

पाऊले वळाली माजघरात

चाकू घेतला हाती तळपता

धरुन बकोटी विकृत बापाची

हात उगारला तिने सळसळता ||

केले आडवे त्यास जमिनीवरी

तोंड दाबले हाताने

छाटून टाकले त्याचे पुरुषत्व

न्याय दिला मुलीला आईने ||



ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

More marathi poem from Chaitrali Dhamankar

आक्रोश

आक्रोश

1 min വായിക്കുക

साद

साद

1 min വായിക്കുക

विरह

विरह

1 min വായിക്കുക

साद

साद

1 min വായിക്കുക

दूरदेशी

दूरदेशी

1 min വായിക്കുക

मैत्री

मैत्री

1 min വായിക്കുക