पिंजरा
पिंजरा
1 min
316
पिंजरा दृश्य असतो,बंदिस्त त्या खगाचा
हळहळतो जीव येथे त्यास्तव प्रत्येकाचा...
पण कित्येक असती ,अदृश्य पिंजरे येथे
बंदिस्त असून आम्हा,भान वास्तवाचे थिटे..
आवळतात पाश कधी,प्रथा अन् परंपरांचे
छाटतात पर कैसे,भरारत्या कैक स्वप्नांचे..
नाव देऊनी तयाला त्याग अन् सोशीक तेचे
बडवतात ढोल येथे फुका बेगडी गौरवाचे...
येईल कधी तिजला,भान नजरबंदी वास्तवाचे
सुटेल का कोडे तिला या अदृश्य पिंजऱ्याचे..?