फुले
फुले
1 min
828
सुंदर हसरा,
दवकणात मोगरा,
उमलू दे की,
माळू गजरा?
प्राजक्त बहरला,
सडा विखुरला,
कोमल स्पर्शाने
टिपू का त्याला?
जाई-जुई लाजरी,
फुलली साजरी,
वेलीवर राहू दे
की माळेत बरी?
बकुळ उमलला,
सुगंध पसरला,
वेणी गुंफू
की वाहू देवाला?