फुलांची वरात
फुलांची वरात
1 min
352
सजली फुलांची ती रात
होती प्रीती ची बरसात
चन्द्र चाँदने होते उश्याला
कसा सावरु मी तो स्वताला
निघाली तार कांची वरात
वारा बेभान गीत गात
नजाकत होती स्वरात
आलाप आरोह त्याच्या ओठा त
रियाज चा ले सुर दरबारा त
धुंद फुलांची सुगन्धी ती बात
फुलवली मन्द दिव्याची वात
तरंग मादकता यौवना ची साथ
भिजली पहाट होवूनी नशेत
पखरण फुलांची घेवूनी क वेत
मांडली आरा स दिव्य नक्ष्यत्रात
उजलला शुक्रतारा अंगणात
करूनी आरती लक्ष्मि घरात
सजली फुलांची ती रात
