STORYMIRROR

Kshitija Bapat

Others

3  

Kshitija Bapat

Others

फोडणीची पोळी

फोडणीची पोळी

1 min
451

शिळ्या पोळीचा चुरा

त्यावर लोणच्याचा मारा

फोडणीची पोळी खायला

जीव होतो वेडा पिसा


फोडणीची पोळी फोडणीची पोळी

अमृततुल्य त्याला गोळी

पंचपक्वानालाही मागे सोडी

अप्रतिम चव जीभेवर दरवळी 


भावंडांसोबत खाताना

येते आठवण लहानपणीची

सकाळची ती न्याहारी

पंचपक्वान्नाची त्याला गोळी


मला जास्त हवी!!!

असे म्हणत होती मारामारी

भाऊ बहिणी होत

होती भांडाभांडी


आजी आईच्या हाताची

ती चव फाइव स्टार

हॉटेलच्या पदार्थावर भारी

असा चमचमीत पदार्थ


कित्येक थोर मंडळी

खाऊन फोडणीची पोळी

झाली विद्वान

स्वप्न झाली त्यांची साकार


चमचमीत फोडणीची पोळी

एकत्र सर्वांबरोबर

खाण्यास येते मजा

नाही तिची अजून कोणा बरोबर तुलना


साहित्याला गुण द्या
लॉग इन