STORYMIRROR

Savita Kale

Others

3  

Savita Kale

Others

फक्त तू

फक्त तू

1 min
312

पावसाची पहिली

ओलिचिंब सर तू

मातीचा दरवळणारा

बेधुंद मृदगंध तू


मनाला लागलेली

अनामिक ओढ तू

नयनांनी पाहिलेले

स्वप्न एक गोड तू


मनाच्या आकाशीची

सुंदर चंद्रकोर तू

चित्त हरण करणारी

एक चित्तचोर तू


अर्थहीन जीवनाला

सापडलेला अर्थ तू

माझ्या आयुष्याला

लाभलेले सामर्थ्य तू


मनाशी जोडलेला

अतूट बंध तू

श्वासात विरघळलेला

प्राजक्ताचा गंध तू


साहित्याला गुण द्या
लॉग इन