STORYMIRROR

AnjalI Butley

Children Stories

3  

AnjalI Butley

Children Stories

पहिलं पाऊल

पहिलं पाऊल

1 min
417

मला आहे दोन हात 

दोन पाय

दोन डोळे

दोन कान

एक नाक

इवले इवले छान!


पहिलं पाऊलं टाकताना 

आईने हळुच पकडले माझे दोन हात

तिच्या हाताचा आधार घेत

हसत टाकलं मी पहिलं पाऊल छान!


आई सांगायची जंगलातल्या प्राण्यांची गोष्ट छान..

हत्ती होता गोल मटोल...

त्याला होते चार पाय

मात्र नव्हते माझ्यासारखे हात

दोन डोळे इवले इवले

दोन कान त्याचे सुपासारखे मोठे

एक नाक त्याचे म्हणजे लांब सोंड


कोणी सांगाल का मला

हत्तीच्या पिल्लाला 

पहिले पाऊल टाकायला

कसा दिला असेल त्याच्या आईने आधार?


अरे आपल्या सारखे दोन हात नाही त्याला!


हात नाही म्हणुन काय झाले?

हत्तीची आई पकडते त्याचे नाक

आणि देते

पहिले पाऊल टाकायला आधार छान!!!




Rate this content
Log in